बस्तोडा-ऊसकईतील अपघातात एक ठार

0
248

म्हापशाहून बस्तोडामार्गे ऊसकई मार्गांवर काल बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास एका दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यात शशांक श्यामसुंदर शेट हा युवक ठार झाला. तर त्याचे वडील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

शशांक शेट व त्याचे वडील एका स्कूटरवरून येत असताना बस्तोडा उसकई मार्गावर पोचताच दुचाकीचा टायर फुटला. त्यात चालक शशांक हा मरण पावला. तर त्याचे वडील श्यामसुंदर हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार रामदास तारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व १०८ रुग्णवाहिकेतून श्यामसुंदर यांना गोमेकॉत उपचारासाठी पाठवले.