नवीन ४१ रुग्णांसह एकूण संख्या ४९०

0
165

 >> मांगूर हिलमध्ये आणखी २९ पॉझिटिव्ह, ४ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत चालले असून नवीन ४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सध्याची संख्या ४९० वर पोहोचली आहे. मांगूर हिलमध्ये नवीन २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मांगूर हिलाशी संबंधित आणखी नवीन ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या ५६४ झाली असून त्यातील ७४ रूग्ण बरे झाले आहेत.

मोर्लेत आणखी २ रुग्ण
मोर्ले-सत्तरी येथे आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून मोर्लेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ झाली आहे.

चिंबलमध्ये आणखी १ रुग्ण
चिंबल येथे कोरोना पॉझिटिव्ह आणखी १ रुग्ण आढळून आला असून चिंबलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे.

केपेत २ कोरोना पॉझिटिव्ह
केपे येथे कोरोना पॉझिटिव्ह २ रुग्ण आढळून आले आहेत. नवेवाडे वास्को आणि बायणा येथे प्रत्येकी आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. राज्यात आलेले २ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

कोरोनाचे ४ रुग्ण बरे
मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणारे ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील आत्तापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित १५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

लॉकडाऊनबाबत खुलासा

आज सोमवार दि. १५ जूनापासून गोव्यात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे वृत्त हे खोटे व निराधार आहे. सरकारचा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा काल माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे करण्यात आला. राज्यात १५ जूनपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर वायरल झाले होते.