पणजी महानगरपालिकेने मुख्य मार्केट सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल दिली.
मार्केटमधील एका तावेर्नमधील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच चिंबल येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने सोमवारपर्यंत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्केटमधील व्यापार्यांची भाजी, फळे व इतर नाशवंत सामान अचानक जाहीर केलेल्या बंदमुळे खराब होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात मार्केट खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंबलमधून येणार्या व्यापार्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. चिंबलमधून येणार्या व्यापार्यांनी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना सामान विक्रीसाठी प्रवेश दिला जाणार आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.