राशोल येथे काल स्कूटरस्वारावर वटवृक्ष पडल्याने ८१ वर्षीय वृद्ध स्कूटरस्वार ठार झाला. राशोल सेमिनारीजवल हा अपघात झाला. राय येथील रोझारियो कामिल फर्नांडिस हा वृद्ध आपल्या स्कूटरने जात असता त्याच्यावर वडाचे झाड पडले. जोरदार वारे व पावसामुळे या भागात अनेक झाडांची पडझड झाली.