गेल्या चार दिवसांपासून फातोर्डा नेहरू स्टेडियमवर व विविध ठिकाणी अडकून पडलेल्या अंदाजे २५०० स्थलांतरितांना दोन श्रमिक रेल्वेतून पाठविण्यात आले.
काल दुपारी पश्चिम बंगाल व ओरिसा येथील १२७९ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे मडगाव स्टेशनवरून सोडण्यात आली. दुसरी गाडी संध्या. ७ वाजता सोडण्यात आली. ती गाडी झारखंड व बिहार येथील स्थलांतरितांना घेऊन गेली. तरीही शेकडो कामगार रेल्वे स्टेशनवर होते. गेले चार दिवस श्रमिक रेल्वे बंद होत्या. त्या काल सोडण्यात आल्या. पावसात मजुरांबरोबर पोलिसांनाही हाल सोसावे लागले.