राज्य कार्यकारी समितीने राज्यातील वाढत्या कोरोना विषाणू बांधीत रुग्णांच्या संख्येमुळे राज्यात प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीची कोविड तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बैठक मुख्य सचिव परिमल राय यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत कोविड १९ चाचणीसाठी २ हजार रूपये शुल्क आकारण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. रेल्वे व इतर अधिकारिणींना प्रवाशांच्या कोविड तपासणीसाठी २ हजार रुपये शुल्क आकारणी करण्यात येण्याबाबत कळविण्याची सूचना आंतरराज्य सेवा कक्षाला करण्यात आली आहे.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आणि सेवा बजावणार्या सरकारी कर्मचार्याकडून कोविड चाचणी शुल्क आकारले जाणार नाही. राज्य कार्यकारी समितीने शिक्षण सचिवांना गोव्यात महाराष्ट्रातील सीमाभागातून शिक्षणासाठी येणार्या १० वीच्या मुलांच्या सोयीसाठी सीमेवरील नजीकच्या विद्यालयात परीक्षा केंद्र स्थापन करण्यावर विचार करण्याची सूचना केली आहे. गोवा विमानतळावरून १४ मेपर्यत ३६ खास विमानातून ७३५२ विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहेत.