दिल्ली कॅपिटल्सच्या सर्वकालीन संघाचे नेतृत्व श्रेयसकडे

0
108

दिल्ली कॅपिटल्सने काल आपला सर्वकालीन एकादश संघ घोषित केला. संघात वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, केविन पीटरसन सारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला असला तरी संघाचे नेतृत्व युवा श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे. तर दक्षिण आफ्रिकन क्विंटन डी कॉकची यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवड करण्यात आल्याने ऋषभ पंतला विशेष फलंदाज म्हणून स्थान देण्यात आलेले आहे.

आयपीएलमधील सक्रीक फ्रेंचायजीपैकी एक असलेल्या दिल्ली संघाला अजूनपर्यंत मात्र एकदाही झळाळत्या चषकावर नाव कोरता आलेले नाही आहे. संघात सेहवाग, डिव्हिलियर्स, तिलकरत्ने, वॉर्नर आणि युवराज सारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना आतापर्यंत एकदाही अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आलेली नाही आहे. दिल्ली कॅपिटल्स सर्वकालीन एकादश संघ पुढील प्रमाणे : वीरेंद्र सेहवाग, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर (कर्णधार), केविन पीटरसन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, इरफान पठाण, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, आशिष नेहरा.