बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. तर, जीएमसीच्या कोविड प्रयोग शाळेत तपासण्यात आलेले १९४ नमुने नकारात्मक आहेत.
गोमेकॉच्या खास विभागात ६ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळामध्ये २ संशयितांवर उपचार सुरू आहे. कोविड प्रयोगशाळेत एकही नमुना प्रलंबित नाही. आरोग्य खात्याने सरकारी क्वारंटाईनखाली २२१ जणांना रविवारी आणले आहेत. राज्यातील नऊ सरकारी क्वारंटाईऩ केंद्रात ३१४ जणांना ठेवण्यात आले आहे.