नवीन चार कोरोना संशयित गोमेकॉत दाखल

0
123

बांबोळी येथील गोमेकॉ आणि हॉस्पिटलच्या कोरोना आयझोलेशन  वॉर्डात ४ कोरोना संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून या विभागात ८ संशयितांवर उपचार सुरू आहेत.

गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १४१ नमुने नकारात्मक आहेत. प्रयोगशाळेत एकूण १६३ नमुने होते. त्यातील १४१ नमुन्यांची तपासणी अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. तर, २२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने ३८ जणांना क्वारंटाईनखाली आणले आहेत.  सरकारी क्वारंटाईऩखालील लोकांची संख्या १२४ एवढी झाली आहे.

दरम्यान, गोव्यात आलेल्या ६२ खलाशांपैकी ६० खलाशांचा कोविड १९ चाचणी अहवाल नकारात्मक आहे. तांत्रिक कारणामुळे २ खलाशांची चाचणी होऊ शकली नाही. त्या दोन खलाशांच्या नमुन्यांची चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.