बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल पदव्युत्तर (पीजी) समुपदेशनाची पहिली फेरी ३० एप्रिल रोजी होणार आहे.
गोमेकॉच्या एम्डी, एम्एस्, डिप्लोमा जागांसाठी पात्र असणार्या सर्व उमेदवारांना ईमेलद्वारे ऑनलाईन समुपदेशनाची पद्धत निवडण्यासाठी हमीपत्र सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
गोवा राज्य कोट्याच्या समुपदेशानासाठीची ही पहिली फेरी असून ती ३० एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात ही पहिली फेरी २० एप्रिल ते ४ मे २०२० दरम्यान होणार होती. पण कोविड -१९ महामारीमुळे नोटरी सेवेत अनेक अडचणी येत होत्या. गोवा वैद्यकिय महाविद्यालयातील प्राधिकारी ज्या दिवशी ही फेरी असेल त्या दिवशी नोटरी सेवेची व्यवस्था करतील. त्यामुळे एआयक्यू आणि राज्य कोट्यातील विद्यार्थ्यांना नोटरी सेवेचा लाभ घेता येईल.