सरकारने जिल्हा पंचायत निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलाव्या, अशी मागणी काल पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वी पत्रकार परिषदेतून केली. निवडणुकांपेक्षा लोकांचे आरोग्य व जीव महत्त्वाचा असून त्याला धोका निर्माण होणार असल्याचे सरकारने कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असे लोकांनाही वाटत असल्याचे लोकमनाचा कानोसा घेतला असता दिसून आल्याचे खंवटे पुढे म्हणाले.
दरम्यान, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून ने गोवा व महाराष्ट्रात येणार्या आणि जाणार्या बस वाहतूक, भाडोत्री प्रवासी व कंत्राटीजीप यांच्यावर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही दिवसांसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.