शिवसरे रिवण येथे शिकारीसाठी गेलेला मॉरिस डायस (२८) याचा घरी परतत असताना अचानक बंदुकीतून गोळी उडून त्याचा मृत्यू झाला. शिकारीहून मोटारसायकलने तो घरी येताना अचानक भरलेल्या बंदुकीतून गोळीचा बार उडाला व डाव्या बाजूच्या काखेत गोळी घुसली. काल मंगळवारी सकाळी ७ वा. ही घटना घडली. मोटरसायकल पडल्याचा आवाज आल्यावर त्याचे वडील व कुटुंबीय घटनास्थळी आले. त्यांनी एकशेआठ बोलावली पण तोपर्यंत त्याचे निधन झाले होते.
डायस हा गावठी बंदुक घेऊन सकाळी शिकारीला गेला होता. शिकार न मिळाल्याने तो भरलेली बंदुक घेऊन घरी परत येताना अचानक बंदुकीचा बार उडाला व गोळी त्याच्या काखेत घुसली. तसाच त्याने घरी येण्याचा प्रयत्न केला पण घराजवळ पोचताच त्याचा मृत्यू झाला.