धेंपो क्रिकेट क्लब आणि सांगलीच्या अजिंक्य वॉरियर्स व्हीआयटीए संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत सांगे क्रिकेटर्स आयोजित अखिल भारत सांगे क्रिकेटर्स चषक टी-२० लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविले.
सांगे क्रीडा संकुल मैदानावर खेळविण्यात आलेल्या कालच्या पहिल्या सामन्यात धेंपो क्रिकेट क्लबने कोल्हापुरच्या शहापुरी जिमखानाचा १० गड्यांनी पराभव केला. तर दुसर्या लढतीत अजिंक्य वॉरियर्स व्हीआयटीएने गडहिंग्लज सिटी अँड तालुका क्रिकेट असोसिएशनवर १५९ धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक ः शहापुरी जिमखाना, १५.५ षट्कांत सर्वबाद ७८, (दिवाकर पाटील १८, आकाश पाटील १० धावा. शेरबहादुर यादव ३-१३, जय बिस्ता २-१०, हर्षद गडेकर २-१५ बळी) पराभूत वि. धेंपो क्रिकेट क्लब, ५.२ षट्कांत बिनदार ७९, (ईशान गडेकर नाबाद ४१, जय बिस्ता नाबाद ३८ धावा). सामनावीर ः शेरबहादुर यादव (धेंपो क्रिकेट क्लब).
अजिंक्य वॉरियर्स व्हीआयटीए, सांगली २० षट्कांत २ बाद २४४, (अनिश चौधरी १२८, सागर कोरे ५०, दीपक गायकवाड ३४ धावा. प्रतीक भुईंबर १-४९, प्रतीक पवार १-३० बळी) विजयी विरुद्ध गडहिंग्लज सिटी अँड तालुका क्रिकेट असोसिएशन, १५ षट्कांत सर्वबाद ८५, (राकेश चिल्मी २२, प्रथमेश धामणकर व ओंकार पाटील प्रत्येकी १० धावा. शमित शेट्टी ३-९, राहित सिंग व अख्तर शेख प्रत्येकी १ बळी). सामनावीर ः अनिश चौधरी (अजिंक्य वॉरियर्स)A.