साळगावकर क्रिकेट क्लब आणि हेमंत पाटील निधी बँक पुणे संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत सांगे क्रिकेटर्स आयोजित सांगे टी-२० अखिल भारत क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सांगेच्या सरकारी मैदानावर खेळविण्यात आलेल्या कालच्या पहिल्या सामन्यात साळगावकर क्रिकेट क्लबने आपला सलग तिसरा विजय नोंदवितान गटात अव्वल स्थान राखत अंतिम चार संघातील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी भटकळ टायगर्स झिनाम संघावर ८ गड्यांनी मात केली. तर हेमंत पाटील अर्बन निधी बँकेने बेळगावच्या आनंद क्रिकेट अकादमीवर ७२ धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक ः भटकळ टायगर्स झिनाम, २० षट्कांत ६ बाद १६४, (बी. वसिम ६०, सईम भटकळ३०, असजत २७ धावा. जावेद खान, उन्नीकृष्णन व धीरज यादव प्रत्येकी १ बळी) पराबूत वि. साळगावकर क्रिकेट क्लब, १६.२ षट्कांत २ बाद १६७, (स्वप्निल साळवी ५३, स्नेहल कवठणकर ४४, चिराग खुराणा ४० धावा. आरिफ व इक्रुमा प्रत्येकी १ बळी). सामनावीर ः स्वप्निल साळवी (साळगावकर क्रिकेट क्लब).
हेमंत पाटील अर्बन निधी बँक, २० षट्कांत ९ बाद १३९, (शिवम धुमाळ ४४, प्रणीत राणे २६, ललित मुसळे १९ धावा. रोहित पाटील २-२६, वैभव कुरिबगी २-२०, रोहित दोडवाड २-२२ बळी) विजयी वि. आनंद क्रिकेट अकादमी, १३ षट्कांत सर्वबाद ६७, (विजय पाटील १७, स्वप्निल येळवे १६, नानोकुमार मलतवाडकर १२ धावा. आदित्य मोरे ३-११, रेहन खान २-१०, शैलेंद्र कसबे २-१६ बळी). सामनावीर ः शिवम धुमाळ (हेमंत पाटील अर्बन निधी बँक).