निर्भयाप्रकरणी दोषींची फाशी लांबणीवर

0
131

>> एका आरोपीची दयेची याचिका

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघा दोषींना आज दि. ३ रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र दौषींपैकी पवन याने राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर केली आहे. या याचिकेवर निर्णय झालेला नसल्यामुळे या चौघांची आज होणारी फाशी पुन्हा टळली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिली आहे. पतियाळा न्यायालयाच्या या स्थगितीने दोषींची फाशी तिसर्‍यांदा टळली आहे. निर्भयाच्या चार दोषींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आज ३ रोजी त्यांना फाशी देण्यात येणार होती. मात्र दोषींतील पवनच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी निर्णय दिलेला नाही. त्याच्या दया याचिकेवर निर्णय व्हायचा आहे. हे समोर आल्यावर पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना उद्या होणार्‍या फाशीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात येत असल्याचं पतियाळा हाऊस कोर्टाने सांगितले आहे.

हे तर यंत्रणांचे अपयश ः निर्भयाची आई
निर्भयाच्या दोषींना उद्या होणार्‍या फाशीवर पतियाळा हाउस कोर्टाने स्थगिती दिल्याने निर्भयाच्या आईने ही तर गुन्हेगारांना पाठिशी घालणारी यंत्रणा आहे असे संतापजनक उद्गार काढले आहेत. निर्भयाच्या दोषींना नक्की कधी फाशी दिली जाईल? असा सवाल त्यांनी सरकार आणि कोर्टाला केला आहे. सतत दोषींची फाशी टाळणे हे यंत्रणांचं अपयश आहे. पण तरीही मी हरणार नाही, असं निर्भयाच्या आईने म्हटले आहे.