कोरोना व्हायरसची भीति

0
344
  •  डॉ. मनाली म. पवार
    गणेशपुरी-म्हापसा

जी माणसं आधीपासून आजारी होती, ज्यांना विविध प्रकारचा आजार होता, ज्यांची प्रतिकारक्षमता कमकुवत होती अशा रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण सर्वप्रथम झाली व तेच जास्त दगावले असे चीनमधील डॉक्टरांचे मत आहे.

खोकला, शिंका किंवा हात थरथरणे ही साधारण लक्षणे आहेत. एखाद्या संक्रमित व्यक्तीस स्पर्श करणे आणि नंतर त्यांच्या तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्शकरणेदेखील व्हायरस संसर्गास कारणीभूत ठरू शकते.

पाणी पचण्यासाठी, शोषले जाण्यासाठी किंवा जीवनशक्ती वाढवण्यासाठी पाणी चांगले उकळून प्यावे. इन्फेक्शनच्या काळात हा नियम सगळ्यांनीच पाळावा. उष्ण जलाने कफाचे विलयन होते. वातामुळे आलेला शोष नाहीसा होतो.

नवनवीन व्हायरसची साथ येणे व त्यानंतर त्या व्हायरसचा शोध लागणे हे जगाला आता नवीन राहिलेले नाही. जगभरात कुठल्या ना कुठल्या व्हायरसची उत्पत्ती होत असते व हे व्हायरस रोगाच्या रुपाने मनुष्यजातीपर्यंत प्रसारीत होऊन थैमान घालत असतात. हे विषाणु मात्र आता ‘साधे व्हायरल’ म्हणून सोडून देण्याइतपत् सौम्य राहिले नाही. बरेच व्हायरस हे दुर्लक्षित, औषधोपचार न घेतल्यास मनुष्याला मृत्यूपर्यंत घेऊन जातात, असे आढळते. असाच चीनमधून पसरलेला कोरोना विषाणू (लेीेपर र्ीर्ंळीीी)ची चर्चा सध्या जगभरात पसरली आहे. सर्वसामान्यांमध्ये म्हणूनच बरेच समज-गैरसमज पसरत आहेत. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगातील बर्‍याच देशांमध्ये आक्रोश पसरला आहे. कोरोना व्हायरस भारत, अमेरिका, थायलंड, जपानमधील देशात पसरत आहे, असा वृत्तांत आहे. चीनमधून आलेल्या लोकांमधून या व्हायरसचा प्रसार होत आहे, असे म्हटले जाते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या बुहान शहरात झाला होता. येथून हा विषाणू संपूर्ण चीनमध्ये वेगाने पसरला आणि लोकांना त्रास देऊ लागला. बुहाननंतर हा विषाणू बीजिंग, शांघाय, मकाओ आणि हॉंगकॉंगपर्यंत पोहोचला आणि लोक संक्रमित होऊ लागले. माध्यमाच्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या ९९ रुग्णांवर उपचार केल्यानंतरचा सविस्तर वृतान्त असा की बुहानमधील जिन्यितान हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या ९९ रुग्णांना आणण्यात आले. त्यांच्यात न्युमोनियाची लक्षणे दिसत होती. या रुग्णांना फुफ्फुसात त्रास जाणवत होता. काहींना ताप आला होता. काहींना खोकला, काही लोकांना श्‍वास घेताना त्रास जाणवत होता. काहींना स्नायूपेशींना त्रास होत होता. काहींना डोकेदुखीचा त्रास तर काही लोकांना घश्यात फोडं आले होते. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जे रुग्ण सर्वांत आधी दगावले ते जरी निरोगी दिसत असले तरी त्यांना प्रदीर्घ काळापासून सिगारेटचे व्यसन होते. एकट्याला न्यूमोनिया झालेला होता. या कारणांमुळे त्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली होती. व्याधीक्षमत्व कमी असलेल्या रुग्णांना कुठल्याही व्हायरसची लागण लगेच होते. म्हणूनच हे दोन रुग्ण सर्वांत आधी दगावले. जी माणसं आधीपासून आजारी होती, ज्यांना विविध प्रकारचा आजार होता, ज्यांची प्रतिकारक्षमता कमकुवत होती अशा रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण सर्वप्रथम झाली व तेच जास्त दगावले असे चीनमधील डॉक्टरांचे मत आहे.

कोरोना व्हायरस म्हणजे काय?…
कोरोना प्रत्यक्षात विषाणूंचा एक मोठा समूह आहे, जो प्राण्यांमध्ये सामान्यपणे आढळतो. यु.एस. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते कोरोना विषाणू जनावरांमधून मानवांपर्यंत पोहोचला. नवीन चीनी कोरोना व्हायरस हा सार्स विषाणुंसारखा आहे. या संसर्गामुळे ताप, सर्दी, धाप लागणे, सर्दी होणे, घसा खवखवणे, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. यामुळे न्युमोनियादेखील होऊ शकतो. याची स्थिती मीडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) आणि सेव्हल ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एसएआरएस) सारखीच आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्ग.च्या मते कोरोना व्हायरस एक झुनोटिक आहे. याचा अर्थ असा की तो २०१९- पउेत द्वारे प्राण्यांतून मानवांमध्ये पसरला आहे, असे मानले जाते. २०१९- पउेत सीफूड खाऊन पसरला होता. कारण कोरोना बाधित रुग्ण हे बरेचसे मांस मार्केटमधील कर्मचारी होते. पण आता कोरोना विषाणू माणसापासून माणसांमध्ये पसरतो आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्याशी संपर्क झाला तर संक्रमणाचा धोका आहे. खोकला, शिंका किंवा हात थरथरणे ही साधारण लक्षणे आहेत. एखाद्या संक्रमित व्यक्तीस स्पर्श करणे आणि नंतर त्यांच्या तोंड, नाक किंवा डोळे यांना स्पर्शकरणेदेखील व्हायरस संसर्गास कारणीभूत ठरू शकते.
हा विषाणू एकाच वेळी प्राणी आणि मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. संशोधनात असे समोर आले आहे की हा कोरोना विषाणू सापांमधून मानवांमध्ये गेला आहे. हा विषाणू प्राण्यांशी संबंधित आहे आणि मांस होलसेल मार्केट, पोल्ट्री फार्म, साप, फर्म ऍनिीमल्समधून प्रवेश करतो.

कोरोना व्हायरस बाधल्यास मृत्युचा धोका किती?….
जो व्हायरस गतीने पसरतो त्यापासूनचा मृत्यूचा धोका कमी असतो. ज्याचा फैलाव कमी असतो त्यांच्यापासून मृत्युदर जास्त असतो. इबोलासारख्या व्हायरसचे तीन हजार जणांना लागण झाली होती. त्यातील सत्तर टक्के रुग्णांना मृत्यूने गाठले. सार्सचा मृत्यूचा धोका दहा टक्के होता. त्यामुळे इथं करोना व्हायरसबाबत त्याचा फैलाव पाहता मृत्युचा धोका कमी आहे. सार्स इबोलाच्या तुलनेत कोरोना व्हायरसपासून मृत्युचा धोका कमी आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये सुमारे २५ हजार जणांना कोरोनाची लागण झाली त्यातील सहाशेहून अधिक जणांना मृत्युने गाठले. चीनशिवाय इतर देशांमध्ये रुग्ण आढळत असले तरी त्याचे मृत्यूचे प्रमाण नगण्य आहे. मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांची प्रतिकारक्षमता खूपच कमी होती.
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णातील लक्षणे….
– नाक वाहणे
– खोकला
– घसा खवखवणे
– अधूनमधून खोकला
– ताप ही आहेत, जो काही दिवस राहू शकतो.
– दुर्बल प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांसाठी ते घातक आहे.
– वृद्ध आणि मुले याला सहज बळी पडतात.
– न्युमोनिया, फुफ्फुसात सूज येणे, शिंका येणे, दमा ही लक्षणेदेखील आहेत.
कोरोना विषाणूच्या बचावासाठी उपचार व खबरदारी…
– सध्या तरी या व्हायरसपासून बचावासाठी विशेष अशी चिकित्सा नाही किंवा लसही नाही.
– आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हीच चिकित्सा होय.
– याची लस येण्यासाठी किमान वर्ष तरी लागू शकते.
– बाधित रुग्णांमध्ये सर्वांत महत्त्वाची श्‍वसन संस्था, त्यात महत्त्वाचा अवयव हे फुफ्फुस व त्यानंतर आतडे. म्हणून श्‍वसन व पचन संस्थेवर कार्य करणारे औषधोपचार करावेत.
– अशा रुग्णांवर या व्हायरसचे संक्रमण होते ज्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी आहे किंवा ज्यांना इतर दुर्धर रोग आहे. अशा परिस्थितीत इतर आजाराचे उपचार तसेच चालू ठेवून कोरोना व्हायरसचे उपचार करावेत. रुग्णांना भरपूर तरल पदार्थ पिण्यास द्यावे. विश्रांती घ्यावी.
– आजारी लोकांपासून दूर रहावे. संसर्ग टाळावा.
– डोळे, नाक आणि तोंड स्पर्श न करण्याचा प्रयत्न करावा. हात-पाय साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत.
– जेव्हा आपण खोकला किंवा शिंक देतो तेव्हा आपले तोंड आणि नाक झाकून घ्यावे आणि आपण ज्या वस्तू आणि पृष्णभागांना स्पर्श करता त्यांचे निर्जतुकीकरण करावे.
– सीफूड शक्यतो टाळावे.
– स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.
– सार्वजनिक वाहतुक वापरल्यानंतर हात स्वच्छ न करता त्यांना आपल्या चेहर्‍यावर आणि तोंडावर लावू नये.
– आजारी लोकांची काळजी घेताना आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या, आपले नाक, तोंड झाकून ठेवा. मास्कचा वापर करा.
आयुर्वेद शास्त्रानुसार कोरोना व्हायरसवर उपचार…
आयुर्वेद शास्त्र हे सूक्ष्मातून स्थूलाकडे जाणारे शास्त्र आहे. या शास्त्रात सूक्ष्मातील सूक्ष्म अशा व्याधीची, त्यांच्या उपचारांची माहिती किंवा अभ्यास झालेला आहे. नवनवीन शोध लावण्याची गरज नाही पण हे शास्त्र सखोलरीत्या अभ्यासले पाहिजे म्हणजे सगळ्या आजारांवर औषधोपचार करता येतील. कोरोना व्हायरसबाधीत रुग्णांवर होणार्‍या लक्षणांचा विचार करता या व्याधीमध्ये कास, श्‍वास, पीनस, ज्वर यांच्या लक्षणांचा प्रादुर्भाव जाणवतो. म्हणजेच यात प्राणवह स्रोतस दुष्टी, रसधातु दुष्टी व कफ-वात दोष दुष्टी जाणवते.
दूषित दोष-धातूचा विचार करता लंघनाने व्याधीची चिकित्सा करावी, वय- अग्नी- बल यांचा विचार करून अनशन वा लघु आहाराचे प्रायोजन करावे.
– लघु आहार द्यायचा झाल्यास शुंठी, मरिच आदी दीपन-पाचन द्रव्यांनी सिद्ध अशी पेय किंवा यवागु द्याली. पेया किंवा यवागु लघु व अग्निदीपक असते. द्रव व उष्ण असल्याने स्वेदन करते. दोषांचे व वातसूत्र – पुरीषाचे अनुलोमन करते. बलाचे रक्षण करते. आमपाचन करून अग्नी संधिक्षुण करते.
– सगळ्या प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये उष्णोदकाला फार महत्त्व आहे.
पाणी चांगले उकळून त्यात तुळशीची चार-पाच पाने, ताज्या आल्याचा छोटा तुकडा, अर्धा चमचा लवंगा घातल्यास कफाचे संतुलन होते.
– पाणी उकळल्याशिवाय पाण्यात औषधी गुणधर्म येत नाही. पाणीसुद्धा पचावे लागते म्हणून पाणी पचण्यासाठी, शोषले जाण्यासाठी किंवा जीवनशक्ती वाढवण्यासाठी पाणी चांगले उकळून प्यावे. इन्फेक्शनच्या काळात हा नियम सगळ्यांनीच पाळावा. उष्ण जलाने कफाचे विलयन होते. वातामुळे आलेला शोष नाहीसा होतो. शृतशीत पाण्यामुळे दाह, संताप, भ्रम आदि लक्षणे कमी होतात.
– त्यातही आयुर्वेद शास्त्रामध्ये साध्या उष्णोदकाचा उपयोग करण्याऐवजी काही औषधी द्रव्यांनी सिद्ध पाण्याचे सेवन सांगितले आहे. या पाण्यास षडंगोदक म्हणतात. हे पाणी दीपन-पाचन द्रव्यांनी सिद्ध असते. याने आमपाचन होते. व्हायरल इन्फेक्शनमध्ये आढळणार्‍या सगळ्या लक्षणांमध्ये उपयुक्त आहे. हे तृष्णशमन, पित्तशमन, ज्वरघ्न, घश्यासाठी उपयुक्त, कास- श्‍वासात उपयुक्त ठरते. षडंगोदक बनविण्यासाठी नागरमोथा, चंदन, सुंठ, वाळा, काळा वाळा आणि पित्तपापड या सहाही द्रव्यांनी पाणी सिद्ध करावे म्हणजे चांगले उकळून घ्यावे.

ज्वरादी लक्षणांचा विचार करता व आमाचा विचार करता तिक्त रसात्मक औषधी द्रव्यांचा वापर करावा. यात तिक्त म्हणजे कडू रसात्मक द्रव्येही लघु व स्रोतःशोधी असतात. या द्रव्यांमुळे आमपाचनही होते. अग्निवर्धनही होते. रुचि उत्पन्न होते. यात गुडूची, पटोल, इंद्रयव, निम्बत्वक आणि काडेचिराईत अशी द्रव्ये येतात. त्यात गुडूची द्रव्य हे रसायन म्हणूनही वापरता येते.

औषधी द्रव्यांमध्ये कास, श्‍वास, पीनस, उपरादि लक्षणांचा विचार करता प्राणवह स्रोतस व अन्नवह स्रोतस यांवर उपयुक्त अशा विशेष औषधांचा विचार करावा. यामध्ये सितोपलादी चूर्ण, तालिसादिचूर्ण, महालक्ष्मी विलासरस, त्रिभुवनकीर्ती रस, श्‍वासकुठार रस, समीरवन्नग रस, हरिद्राखण्ड, दशमूलारिष्ट, कनकासव, वासावलेह इत्यादी औषधांचा वैद्याच्या सल्ल्याने उपयोग करावा.
च्यवनप्राशावलेह, गडूची रसायन, सुवर्णसिद्ध जल आदी द्रव्यांचा रसायन म्हणून बल वाढवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पीनस, कास, श्‍वास, व्हायरल इन्फेक्शनमध्ये विशेष गुणकारी आहे.

सुवर्णसिद्ध जल बनविण्यासाठी सोन्याचा पत्रा किंवा नाणे पाण्यात टाकून ते पाणी अर्धा तास चांगले उकळावे व हे पाणी प्यायला द्यावे.
योग्य आहार, योग्य औषधोपचार व खबरदारी घेतल्यास कोरोना व्हायरस काही ‘रोना’ आणणारी नाही.