>> कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धा
कर्नल सी.के. नायडू (२३ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील सांगे क्रिकेट अकादमी मैदानावर सुरू असलेल्या लढतीत रेल्वेचा संघ गोव्याविरुद्ध विजयाच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे. आ शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी केवळ १२३ धावांची गरज असून त्यांचे ८ गडी शिल्लक आहेत. पहिल्या डावात ५२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर रेल्वेने गोव्याचा दुसरा डाव अवघ्या २३० धावांत संपवला. विजयासाठी २८३ धावांचा पाठलाग करताना तिसर्या दिवसअखेर रेल्वेचा संघ २ बाद १६० अश भक्कम स्थितीत आहे.
साहीम हसन (नाबाद ७०, १५८ चेंडू, १० चौकार) व नवनीत विर्क (नाबाद ७३, १२७ चेंडू, १० चौकार) ही जोडी नाबाद आहे. या द्वयीने तिसर्या गड्यासाठी १२८ धावांची अविभक्त भागीदारी केली आहे.
संक्षिप्त धावफलक ः गोवा पहिला डाव सर्वबाद २१३, रेल्वे पहिला डाव ः सर्वबाद १६१, गोवा दुसरा डाव (४ बाद १२५ वरून) ८१.१ षटकांत सर्वबाद २३० (निहाल सुर्लकर नाबाद ६१, बलप्रीत चढ्ढा १२, युवराज ३४-४, हर्ष त्यागी २४-१, कनिष्क सेठ ४०-३, आदर्श सिंग ३३-१, अविजित सिंग ४३-२), रेल्वे दुसरा डाव ५१ षटकांत २ बाद १६० (सलिम हसन नाबाद ७०, नवनीत विर्क नाबाद ७३, मोहित रेडकर ६८-१, निहाल सुर्लकर १८-१)