पाऊसकर खंडणीप्रकरणी आणखी एकास अटक

0
125

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर खंडणीसाठी धमकी प्रकरणी मुंबई येथील मनीष मनसुखभाई शहा (४३) याला पणजी पोलिसांनी काल अटक केली.
मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकीप्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मंत्री पाऊसकर यांना ३ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन करण्यात येत होते. मंत्री पाऊसकर यांनी खंडणीचे पैसे नेण्यासाठी आपल्या बंगल्यावर संशयितांना बोलाविले होते. महाराष्ट्रातील तिघे जण खंडणीचे पैसे नेण्यासाठी मंत्री पाऊसकर यांच्या बंगल्यावर आलेल्या तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. सदर तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पणजी पोलिसांनी या प्रकरणी मनीष शहा याला अटक करून तपासाला सुरुवात केली आहे.