>> कृती दलासह खास कक्ष तयार ः आरोग्यमंत्री
देशातील काही भागात आढळून आलेल्या कोरोना जंतुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दलाची स्थापना करून कोसोनाला रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय हाती घेण्यात येत आहेत.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी कृती दलाची स्थापना करून रुग्ण तपासणी आणि उपचाराबाबत जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याची निर्देश दिले आहेत. कृती दल मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली कार्यरत राहणार आहे.
कोरोना जंतुसंसर्गाच्या विषयावरून लोकांनी घाबरू नये. या जंतुसंसर्गाचा राज्यात फैलाव होऊ नये म्हणून आवश्यक उपाय योजना हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
खास कक्ष तयार
डॉ. बांदेकर यांनी करोनाच्या विषयावर एक आढावा बैठक घेतली. राज्यात करोना जंतुसंसर्गाच्या नियंत्रण व बाधा होऊ नये म्हणून हाती घेण्यात येणार्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आहे. करोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी खास कक्ष तयार करण्यात आला आहे. आरोग्य विभाग व इस्पितळाकडून रुग्णांची योग्य तपासणी केली जात आहे.