>> अद्ययावत सुविधायुक्त अग्नीशामक बंब
राज्य आपत्ती निवारण विभाग अत्याधुनिक साधनसुविधांनी युक्त करण्यावर भर दिला जात आहे. अग्निशामक दलात नव्याने समाविष्ट केलेले दोन अत्याधुनिक साधन सुविधांनी युक्त अग्निशामक बंब त्याचाच एक भाग आहे. आणखी अत्याधुनिक उपकरणे लवकरच समाविष्ट केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
अग्निशामक दलासाठी अंदाजे ४ कोटी ५९ लाख ६० हजार रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या दोन अत्याधुनिक साधन सुविधांनी युक्त अग्निशामक बंबांचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. या नवीन अत्याधुनिक अग्निशामक बंबांमध्ये सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यात विजेचा पुरवठा करणारी खास यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. वीज पुरवठा नसलेल्या भागात किमान आठ तास नवीन अग्निशामक बंबातील वीज उपकरणावरून काम करण्याची सोय आहे.
६ कोटींच्या थकबाकीसाठी
सी स्कॅन मरीनला नोटीस
सी स्कॅन मरीन प्रायव्हेट आणि जहाज उद्योग या कंपनीकडील ६ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी त्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.