>> पहिला टी-ट्वेंटी सामना आज
भारत व न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-ट्ेंटी सामना आज खेळविला जाणार आहे. चांगला खेळ करून प्रभाव पाडण्यापेक्षा न्यूझीलंडच्या वातावरणाशी व खेळपट्ट्यांशी लवकरात लवकर जुळवून घेण्याचे आव्हान भारताच्या खेळाडूंना पेलावे लागणार आहे.
प्रमुख खेळाडूंंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची गोलंदाजी फळी कमकुवत झाली आहे. त्यामुळे हॅमिश बेेनेट, स्कॉट कुगलेन या नवोदित वेगवान गोलंदाजांसह न्यूझीलंडचा संघ आज उतरू शकतो. ऑकलंडचे मैदान मोठ्या धावसंख्येसाठी ओळखले जात असल्यामुळे भारतीय संघ पाचपेक्षा अधिक गोलंदाज घेऊन उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवम दुबे व वॉशिंग्टन सुंदर या दोघांना ‘अंतिम ११’मध्ये संधी मिळू शकते. जडेजाला खेळविण्याचा पर्यायही विराटकडे आहे. मोहम्मद शमी, नवदीप सैनी व जसप्रीत बुमराह या त्रिकुटाची जागा पक्की आहे. लोकेश राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देण्याचे संकेत कोहलीने दिल्याने मनीष पांडेच्या रुपात स्पेशलिस्ट फलंदाज संघात येऊ शकतो. भारतापेक्षा न्यूझीलंडचा संघ फलंदाजी विभागात अधिक अनुभवी असून रॉस टेलर, केन विल्यमसन व मार्टिन गप्टील हे अनुभवी त्रिकुट भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. घरच्या वातावरणात खेळण्याचा फायदादेखील किवी संघाला मिळणार आहे.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड संभाव्य ः मार्टिन गप्टील, कॉलिन मन्रो, केन विल्यमसन, टिम सायफर्ट, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साऊथी, स्कॉट कुगलेन व हॅमिश बेनेट.