सोशल मिडियावरील ‘ती’ जाहिरात बनावट ः वन खाते

0
171

वन खात्यात वनरक्षकांच्या ५४३ पदांच्या भरतीबाबत सोशल मिडियावर फिरणारी जाहिरात बनावट आहे, असे वन खात्याने जाहीर केले आहे.
वनखात्यामध्ये वनरक्षकांच्या भरतीबाबत एक जाहिरात सोशल मिडियावर फिरत आहे. या जाहिरातीमध्ये वन खात्यात नवीन ५४३ वनरक्षकांची भरतीसाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये वनरक्षकांचे वेतन व इतर माहिती देण्यात आलेली आहे. वन खात्याने वनरक्षकांच्या भरतीबाबत कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. सोशल मिडियावरील बनावट वनरक्षक जाहिरातीवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, अशी नोटीस वन खात्याने जारी केली आहे.