स्कीमरद्वारे पैसे काढलेल्या दोन संशयितांना अटक

0
146

म्हापसा परिसरातील विविध बॅकांच्या एटीएममधून स्कीमरचा वापर करून रक्कम काढल्याच्या संशयावरून म्हापसा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आयव्हो पेट्रो मॅचीनोव (४७) रा. हडफडे व मिलन आयवनो दावरासकी (४५) रा. हडफडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लॅपटॉप, ६ मोबाईल, २ स्क्रीमर मशीन व इतर वस्तू हस्तगत केल्या. म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत सापळा रचला व वरील दोघांही संशयितांना अटक केली. त्यांना म्हापसा न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
२१ डिसेंबरपासून आठ दिवसात म्हापसा परिसरातील खात्यातील सुमारे २० ते २५ लाख रुपये मुंबईहून एटीएममधून काढल्याच्या तक्रारी म्हापसा पोलिसांत देण्यात आल्या होत्या. त्यावेळेपासून पोलीस पाळतीवर होते. शनिवारी रात्री १०.३०च्या सुमारास एकास दाबोळी विमानतळावर व एकास म्हापसा येथील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना पकडण्यात आले.