महाराष्ट्रात खातेवाटपाला मंजुरी

0
122

महाराष्ट्रात काल रविवारी अखेर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शनिवारी रात्री मंजुरीसाठी पाठवली होती. त्याला राज्यपालांनी काल रविवार दि. ५ रोजी सकाळी मंजुरी दिली.

यात ३३ मंत्री आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या खातेवाटपामध्ये मंत्रिपदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, जयंत पाटील, नवाब मोहम्मद इस्लाम मलिक, अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, उदय सामंत, दादाजी भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, के. सी. पाडवी, संदिपानराव भुमरे, बाळासाहेब ऊर्फ श्यामराव पाटील, अनिल परब, अस्लम शेख, यशोमती ठाकूर शंकराराव गडाख, धनंजय मुंडे व आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे.

राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शंभुराज देसाई, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, दत्तात्रेय भरणे, विश्वजीत कदम, राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, आदिती तटकरे यांची निवड झाली.