>> मगो ः सवलत कोणाच्या फायद्यासाठी दिली?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक समस्या भेडसावत असताना वाहतूक खात्याने रस्ता करात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारचा ५० ते ५२ कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे, असा आरोप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.
राज्य सरकारने आर्थिक समस्येमुळे मागील नऊ महिन्यात २ हजार कोटीचे कर्ज घेतले आहे. सरकारी कामकाज, पगारासाठी निधीची टंचाई असताना रस्ता करात ५० टक्के सवलत कुणाच्या फायद्यासाठी देण्यात आली आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना आर्थिक नियोजनाचे शास्त्र शिकून घेण्याची गरज आहे. सरकारच्या वायफळ खर्चावर नियंत्रण घालण्याची गरज आहे. सरकारकडून विकास कामांच्या नावाखाली कर्ज घेतले जात आहे. प्रत्यक्षात कर्जाच्या स्वरूपात घेण्यात आलेल्या रक्कमेचा कर्मचार्याचा पगार व इतर कामावर खर्च केला जात आहे. सरकारकडून विकास कामांच्या अनेक निविदा प्रसिद्ध केल्या जात आहेत.