केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ११ राज्यांच्या भाजपेतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वादग्रस्त सीएए कायद्यासंदर्भात केरळप्रमाणेच भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. देशाची एकता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही वाचविण्यासाठी असे पाऊल उचलावे असे आवाहन त्यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. केरळ विधानसभेत गेल्या मंगळवारी सीएए कायदा रद्द करण्याची मागणी करणारा संमत करण्यात आला आहे.
बिहार, प. बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, ओडिशा व पुडुचेरी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना विजयन यांनी पत्रे लिहिली आहेत.
केरळ विधानसभेत सीएएविरोधी ठराव संमत झाल्यानंतर केंद्रीय कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी त्याला बेकायदा व घटनाविरोधी संबोधले होते.
तसेच केरळच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत कायदा सल्ला घेण्यास सुनावले होते. केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनीही या ठरावाला घटनात्मक वैधता नसल्याचे म्हटले होते.