राज्य सरकारचे सरकारी रोख्यांची विक्री करून कर्ज घेण्याचे सत्र सुरूच ठेवले असून सरकारने १० डिसेंबर २०१९ रोजी १०० कोटीचे रोखे विक्रीस काढले आहेत.
राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात ४०० कोटीचे रोखे विक्रीस काढले आहेत. आता, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला १०० कोटीचे कर्ज घेतले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ महिन्याच्या कारकिर्दीत राज्य सरकारने रोखे विकून १९५० कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. डिसेंबर महिन्यातील १०० कोटी कर्जामुळे आता हा आकडा २ हजार कोटीवर पोहोचणार आहे.
राज्यातील खाण व्यवसाय बंदी, जीएसटी व इतर काही कारणांमुळे सरकारी महसुलाचे प्रमाण घटल्याने राज्य सरकारला आर्थिक व्यवस्थापन करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. सरकारकडून कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज घेतले जात आहे. विकास कामे मार्गी लावण्यासाठी कर्ज घेतले जात आहे, असा दावा केला जात आहे.
राज्य सरकारचे कर्ज वाढत चालले आहे. सरकारच्या वित्त विभागाने १०० कोटीच्या कर्ज रोख्यांच्या विक्रीबाबत सूचना जारी केली आहे.