पर्रीकरांच्या समाधीसाठी ८.५९ कोटींची निविदा जारी

0
188

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने मिरामार पणजी येथे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मृती स्थळ बांधण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ७९ हजार ७०४ रूपयांची निविदा जारी केली आहे.

मिरामार येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळाजवळ दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. सरकारने त्याच ठिकाणी पर्रीकर यांचे आकर्षक स्मृती स्थळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मृती स्थळासाठी १० कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या स्मृती स्थळासाठी आराखडा तयार करून घेतला आहे.

आता बांधकाम सुरू करण्यासाठी निविदा जारी केली आहे. येत्या १३ डिसेंबर २०१९ रोजी दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या जयंती दिनी स्थळी स्थळाच्या बांधकामाची पायाभरणी केली जाणार आहे. सहा महिन्यात स्मृती स्थळाचे बांधकाम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. स्मृती स्थळाच्या बांधकामासाठी ठेकेदारांकडून निविदा ७ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यत स्वीकारण्यात येणार आहे. जीएसआयडीसीकडे प्राप्त होणार्‍या निविदा ९ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ३.३० वाजता उघडण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र ठेकेदारांना स्मृतीस्थळाच्या बांधकामासाठी आदेश जारी केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.