सरकार स्थापनेवर सोनियांशी चर्चा झाली नाही ः पवार

0
113

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी काल नवी दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय स्थितीची सविस्तर माहिती दिली. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावर यावेळी सोनिया गांधींशी चर्चा झाली नाही. अशी माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली.

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत चर्चा झाली नाही असेही पवार यांनी सांगितले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी हेही या बैठकीवेळी उपस्थित होते असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे काही नेते चर्चा करतील व आम्हाला भेटतील अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे की नाही यावर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करून चालणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.