चर्चिल ब्रदर्सची धेंपोवर मात

0
110

>> गोवा प्रो-लीग

चर्चिल ब्रदर्स फुटबॉल क्लबने धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचा ५-२ अशा गोलफरकाने पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल दमदार विजयासह पूर्ण गुणांची कमाई केली.

जुने गोवा येथील एला मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात चर्चिल ब्रदर्सच्या विजयाचा हीरो ठरला तो लालखावपुईमाविया. त्याने शानदार हॅट्‌ट्रिक (६५वे मिनिट, ७३वे मिनिट, ७७वे मिनिट) नोंदविली. विलिझ प्लाझाने (१२वे मिनिट आणि १८वे मिनिट) दोन गोल नोंदविले. तर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबची पिछाडी २-५ अशी भरून काढणारे गोल पेद्रू गोन्साल्वीसने दुसर्‍या सत्राच्या इंज्युरी वेळेत नोंदविले.