राज्यात विविध किनार्यांवरील घटनांत खवळलेल्या समुद्रातील जोरदार लाटांमुळे पाण्यात ओढल्या गेलेल्या १२ जणांना काल वाचविण्यात आले.
पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये अशी सूचना करण्यात आली होती. तथापि, मंगळवारी राज्यातील विविध भागातील समुद्रात पर्यटक उतरले होते.
यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा समावेश होता. कोलवा, बेताळभाटी, बागा, पाळोळे, माजोर्डा, हरमल, कांदोळी या समुद्र किनार्यांवर १२ जणांना वाचविण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हरमल आणि माजोर्डा येथे प्रत्येकी दोघांना वाचविण्यात आले. बेताळभाटी समुद्रकिनार्यावर रशियातील तीन जणांच्या कुटुंबाला वाचविण्यात आले. कांदोळी समुद्र किनार्यावर १९ वर्षीय युवक सुदैवाने बचावला.