रविवारी रात्रौ मद्यविक्रेते दुकान मालक फ्रेडी डायस (२३) यांच्यावर सहा अज्ञात तरुणांनी मान व पाठीवर सुर्याने हल्ला करून फरार झाले. फातोर्डा पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
फ्रेडी डायस हे दंवदे येथील असून चौगुले महाविद्यालय परिसरात त्यांचे दारूचे दुकान आहे. रविवारी रात्रौ ११ वाजता दुकान बंद करून तेे घरी परतले. अर्ध्या वाटेवर आपला मोबाईल दुकानावरच राहिल्याचे आठवले व तेे मोबाईल आणण्यासाठी पुन्हा दुकानावर गेले. शटर उघडून मोबाईल घेऊन परत शटर्स बंद करण्याच्या तयारीत असता दोन मोटरसायकलवरून तोंडावर पांढरा बुरखा घातलेले सहाजण आले व दारूची मागणी करू लागले.
तात्काळ त्यांनी शटर्स पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत असताना एकाने त्यांच्या मानेवर व पाठीत सुरा खुपसला त्यात ते जखमी होऊन तो खाली कोसळताच ते सर्वजण फरारी झाले. त्यावेळी फ्रेडीचे दोन मित्र होते. बुरखाधार्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते घाबरून गप्प बसले. पोलिसांना याची माहिती देताच त्यांनी जखमीला इस्पितळात दाखल केले. पोलीस निरीक्षक कपील नायक तपास करीत आहेत.