>> कनिष्ठ राष्ट्रीय मुलींची मुष्टियुद्ध स्पर्धा
रोहतक, हरयाणा येथील नॅशनल बॉक्सिंग अकादमीत सुरू असलेल्या ३र्या बीएफआय कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत गोव्याच्या चार मुष्टियोद्ध्यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
आज ११ रोजी या चौघीही उपांत्य फेरीतील आपले पदक निश्चित करण्यासाठी खेळतील. ६३ किलो वजनी गटात आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त अश्रेया नाईक हिची लढत झारखंडच्या स्नेहा गुप्ता हिच्याशी होणार आहे. अश्रेयाने महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धीला ५-० असे एकतर्फी पराभूत करीत अंतिम आठांत स्थान मिळविले आहे. जेसिका कार्रा हिने केरळच्या कृष्णा नेंधू हिला पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अंडरडॉग मानल्या गेलेल्या नेहा कदमने दोन लढती जिंकल्या असून आता तिची लढत हरयाणाच्या तन्नू हिच्याशी होणार आहे. तर सुमन यादवने दिल्लीच्या कोमलचा ५-० असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिची लढत महाराष्ट्राच्या संध्याशी होणार आहे.