पंतप्रधानांसमोर म्हादई प्रश्‍न मांडण्याची तयारी : मुख्यमंत्री

0
111

सरकार म्हादई पाणी प्रश्‍नी गंभीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हादई प्रश्‍नी विशेष याचिका दाखल करून घेतली असून ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. म्हादईचा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलस्रोत मंत्री शेखावत यांच्यासमोर मांडण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतरांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिली.
म्हादई प्रश्‍नी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. आगामी चार महिन्यात म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने सुरू केलेल्या कामाची पाहणी करणे शक्य नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

म्हादई लवादाचा निवाडा जाहीर झाल्यानंतर कर्नाटक सरकारने पाणी वळविले आहे. म्हादईच्या वळविण्यात आलेल्या पाण्याची पाहणी करण्याची गरज आहे, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले. जलस्रोत खात्याने म्हादईसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. या मास्टर प्लॅनचा ङ्गेरआढावा घेऊन आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे, असे जलस्रोत मंत्री ङ्गिलीप नेरी यांनी सांगितले.