बारावीची पुरवणी परीक्षा ७ ते १४ जून दरम्यान

0
140

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जूनमध्ये घेण्यात येणारी इयत्ता १२ वी ची पुरवणी परीक्षा ७ ते १४ जून दरम्यान घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी १८०० मुलांनी नोंदणी केली असून परीक्षा म्हापसा आणि नुवे- मडगाव येथे दोन केंद्रातून घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या मध्ये १०९४ मुलगे आणि ७०६ मुलींचा समावेश आहे.

परीक्षा सकाळी ९.३० आणि संध्याकाळी २.३० अशा दोन सत्रातून घेतली जाणार आहे. म्हापसा केंद्रातील परीक्षा आसगाव बार्देश येथील एस.एम. कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात घेतली जाणार आहे. तर, नुवे-मडगाव केंद्रातील परीक्षा कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालयात घेतली जाणार आहे.