अमित शहांच्या ‘रोड शो’वेळी हिंसाचार

0
194
West bengal,May 14 (ANI): Fire breaks as violance reported between supporters during the road show of BJP President Amit Shah in Kolkata on Tuesday. (ANI Photo)

>> कोलकातात तणाव
>> शहांच्या वाहनावर दगडफेक
>> लाठ्याही भिरकावल्या

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान काल मंगळवारी संध्याकाळी मोठा हिंसाचार झाला. कोलकाता विद्यापीठाजवळून अमित शहा यांचा रोड शो जात असताना अमित शहा उभे असलेल्या ट्रकच्या दिशेने लाठ्या भिरकावण्याबरोबरच दगडफेक करण्याची घटना घडली. यानंतर भाजप आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते भिडल्याने गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

अमित शहा यांच्या रोड शोसाठी आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. दरम्यान, शहा यांचा ताफा कोलकातातील बिधान सराई भागातील कॉलेज हॉस्टेलजवळून जात असताना शहा ज्या ट्रकवर होते त्या ट्रकच्या दिशेने काठ्या भिरकावण्यात आल्या. शहा यांच्या ताफ्यावर हॉस्टेलमधून दगडफेकही करण्यात आली.

कॉलेज हॉस्टेलच्या ज्या इमारतीतून दगडफेक करण्यात आली त्या इमारतीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. इमारतीबाहेर जाळपोळही करण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अमित शहांच्या दिशेने लाठ्या फेकण्यात आल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचारानंतर रस्त्यावर एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पळापळ सुरू असल्याचे चित्र होते. रस्त्यावर जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. दगडफेकीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसह काही पत्रकारही जखमी झाले आहेत. काही ठिकाणी पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. विद्यासागर कॉलेजमधील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही जमावाने तोडफोड केली.

रोड शो पूर्वीच या तणावाची सुरुवात झाली होती. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले मोदी-शहांचे पोस्टर्स तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हटविले होते. त्यामुळे टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, या घटनेबाबत भाजपने तृणमुलचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर आरोप केले आहेत. भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ममतांच्या गुंडांनी आणि पोलिसांनी रोड शो पूर्वीच मोदी-शहांचे सर्व पोस्टर्स आणि भाजपचे झेंडे काढून टाकल्याचा आरोप केला आहे.

टीएमसीचे गुंड भाजपला
रोखू शकत नाही : शहा
भाजपच्या रोड शोला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तृणमूल कॉंग्रेसच्या गुंड हे पाहून चिडले व त्यांनी रोड शोवर हल्ला केला असा आरोप केला अमित शहा यांनी केला आहे. टीएमसीचे गुंड भाजपाला रोखू शकत नाहीत असे सांगून आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.