समाजवादी पार्टी व बहुजन समाजवादी पार्टी यांच्यात उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डाव असल्याचा आरोप काल बसपाच्या प्रमुख मायावती यांनी काल केला. उत्तर प्रदेशमध्ये उभय पक्षांची युती झालेली असून बसपा ३८ तर सपा ३७ जागा लढवित आहे. या आघाडीने अमेठी व रायबरेली या जागा कॉंग्रेससाठी व तीन जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला सोडण्यात आल्या आहेत.