![24pm-modi5](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/04/24pm-modi5-e1556169153556.jpg)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात निवडणूक प्रचारसभांमधून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीकास्त्रांचा भडीमार सुरू असतानाच मोदी यांची मुलाखत अभिनेता अक्षय कुमार याने काल घेतली. यावेळी मोदी यांनी ममता बॅनर्जी अजूनही आपल्याला दर वर्षी दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेटीदाखल पाठवित असतात असे सांगितले.
याचबरोबर कॉंग्रेसचे ज्येष्ट नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी आपले चांगले मैत्रीसंबंध असल्याची माहिती मोदींनी दिली. या मुलाखतीवेळी मोदी यांनी अक्षयकुमारला राजकीय प्रश्नांऐवजी खाजगी जीवनाविषयी दिलखुलास उत्तरे दिली.
बांगला-देशच्या पंतप्रधान शेख हसीना यासुध्दा आपल्याला वर्षातून तीन-चार वेळा मिठाई पाठवतात हे ममतांना समजल्यानंतर त्याही (ममता) वर्षातून दोनदा मिठाई पाठवू लागल्याचे मोदींनी सांगितले.
युवावस्थेत सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. मात्र पंतप्रधान होईन असे कधीही वाटले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती व माझ्या आईने गावात साखर वाटली असती असे त्यांनी सांगितले. लहानपणी आपल्याला वाचनाची आवड होती असे ते म्हणाले.