भाजपचा हक्काचा मतदार समजला जाणारा व्यापारी वर्ग नोटाबंदी, जीएसटीमुळे सध्या काहीसा नाराज असल्याने व्यापारी वर्गाला चुचकारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये व्यापार्यांच्या संमेलनात बोलताना मोदींनी व्यापार्यांवर स्तुतिसुमने उधळली. व्यापार्यांनी नेहमी देशाचाच विचार करत स्वत:ला झोकून दिले. जगाच्या कानाकोपर्यात व्यापार्यांनीच देशाच्या संस्कृतीचा प्रसार केला. त्यांच्या मेहनतीचा माझ्यावर प्रभार असल्याचे गौरवोद्गार मोदींनी काढले. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसने चुकीचे धोरणे राबविल्याने व्यापारीवर्गाचे नुकसान झाले. कॉंग्रेसने व्यापार्यांचा सतत अवमान केल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
व्यापार्यांच्या दुराव्याचा फटका राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपला बसला होता. त्यानंतर सादर झालेल्या अर्थसंकल्पात व्यापारी वर्गासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळवणार्या छोट्या व्यापार्यांना करात सवलत देण्यात आली आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रातही पुन्हा सत्ता आल्यास व्यापारी वर्गाला निवृत्ती वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा व्यापारी वर्गाशी संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. याचे आश्वासन दिले आहे. यापार्श्वभूमीवर मोदींचा हा व्यापारी वर्गाशी संवाद महत्वाचा मानला जात आहे.