श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत

0
106

भारताच्या किदांबी श्रीकांत याने ७५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या मलेशिया ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत मात्र पी.व्ही. सिंधू हिला गाशा गुंडाळावा लागला आहे. आठव्या मानांकित श्रीकांतने थायलंडच्या खोसित फेतप्रताब याचा याचा २१-११, २१-१५ असा पराभव केला. हा सामना अर्ध्यातासाहून थोडावेळ जास्त चालला. ‘अंतिम आठ’मध्ये त्याचा सामना ऑलिम्पिक विजेत्या व चीनच्या चौथ्या मानांकित चेन लॉंग याच्याशी होणार आहे. महिला एकेरीत पाचव्या मानांकित सिंधूने दहाव्या क्रमांकावरील सूंग जी ह्युन हिच्याविरुद्ध शरणागती पत्करली. पहिल्या गेममध्ये १३-१० अशा आघाडीनंतरही सिंधूने सामना १८-२१, ७-२१ असा गमावला. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांना स्थानिक जोडी तान कियान मेंग व लायपेई जिंग यांनी २१-१५, १७-२१, १३-२१ असे पराजित केले.