कोलकाता
प. बंगालमधील संत्रागाची रेल्वे स्थानकावरील पदपुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत दोघेजण मृत्यूमुखी पडले असून १७ जण जखमी झाले. एकाच वेळी सदर स्थानकावर येणार असलेल्या वेगवेगळ्या रेल्वेंबाबत ध्वनीक्षेपकावर झालेल्या सूचनेनंतर ही चेंगराचेंगरी झाल्याचे रेल्वेचे प्रवक्ते संजय घोष यांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींपैकी काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.