राफेल : रिलायन्सला कंत्राट म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा अपमान : राहूल

0
118
Bengaluru: Congress President Rahul Gandhi during an interaction with a group of working and retired employees of the state-run aerospace and defence company Hindustan Aeronautics Ltd, in Bengaluru, Saturday, Oct 13, 2018. (PTI Photo/Shailendra Bhojak) (PTI10_13_2018_000149B)

बंगळुरू
राफेल जेट विमान खरेदीप्रकरणी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोपांचे सत्र सुरू केलेल्या राहुल गांधी यांनी काल संरक्षणविषयक उत्पादन करणारी सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिकट लिमिटेड्‌या (एचएएल) कर्मचार्‍यांशी संवाद साधला.
राफेलचे कंत्राट मोदी सरकारने या क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या रिलायन्स कंपनीला देऊन एचएएलचा अपमान केला आहे असे मत राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केले. एचएएल कंपनीला संरक्षणविषयक साधन उत्पादन निर्मितीचा ७० वर्षांचा अनुभव असताना कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला मोदी सरकारने कंत्राट कसे दिले असा सवाल गांधी यांनी केला. देशाच्या संरक्षणात एचएएल कंपनीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण अशी राहिली आहे. या कंपनीच्या कर्मचार्‍यांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत असे ते म्हणाले.
यावेळी या कंपनीच्या विद्यमान व निवृत्त कर्मचार्‍यांनी गांधी यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.