मडगाव (क्री. प्र.)
धर्मशाळा-हिमाचल प्रदेश येथे १४ ते २३ ऑक्टोबरपर्यंत होणार्या अंडर-१९ महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व तेजस्विनी दुरागड हिच्याकडे सोपविण्यात आले आहे.
घोषित संघ पुढील प्रमाणे ः तेजस्विनी दुरागड (कर्णधार), पूर्वजा वेर्लेकर, शिंदिया नाईक, दिक्षा आमोणकर, दिव्या नाईक, पूर्वा भाईडकर, इब्तिझम शेख, दिक्षा गावडे, शेजल सातोर्डेकर, गायत्री तलवार, मेताली गवंडर, स्नेहा कोर्डे, उर्वशी गोवेकर, सावली कोळंबकर, रेहना कामत, तनया नाईक.