पैंगीण (न. प्र.)
काणकोण तालुक्यातील खोतीगाव व गांवडोगरी पंचायत क्षेत्रातील सरकारी शाळा इमारतीची काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी केली. शिक्षण खात्याचे अधिकारी तसेच पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या समवेत ही पाहणी केली. खोतीगाव पंचायत क्षेत्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळा इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही शाळांची छप्परे मोडकळीस आलेली आहेत, तर काही शाळा इमारतीच्या वर्गखोल्यांची जमीन उखडलेली आहे.
खोतीगाव व गांवडोगरी माध्यमिक शाळांच्या इमारतीची अर्धवट राहिलेली दुरूस्ती तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार फर्नांडिस यांनी महामंडळाच्या अधिकार्यांना केली. काही जुन्या प्राथमिक शाळा इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्याचीही डागडुजी करण्याची गरज आमदारांनी अधिकार्यांकडे बोलताना व्यक्त केली.