…तर गोव्यावर केरळप्रमाणे आपत्ती

0
144

>> पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा इशारा

गोव्याने पर्यावरणाच्या रक्षणार्थ वेळीच आवश्यक उपाययोजना न केल्यास केरळ प्रमाणे आपत्तीच्या परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना काल दिला आहे.
केरळ राज्यावर ओढवलेल्या आपत्तीवर मत व्यक्त करताना पर्यावरणतज्ज्ञ गाडगीळ यांनी वरील मत व्यक्त केले आहे. गाडगीळ यांनी काही वर्षांपासून पश्‍चिम घाटाचा अभ्यास केलेला आहे. इतर राज्याप्रमाणे गोव्यात सुध्दा पैसा कमावण्यासाठी पर्यावरणाचा र्‍हास करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. केरळ प्रमाणे गोव्यात मोठे डोंगराळ भाग नसले तरी आपत्ती ओढवू शकते. दक्षिण भारतात यापूर्वी अशा प्रकारची पूरपरिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झालेली नव्हती, असेही त्यांचे मत आहे.