१४ लाखांचे विदेशी चलन दाबोळी विमानतळावर जप्त

0
120

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत एका विदेशी नागरिकांकडून चौदा लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा बंगळूरूहू दुबईला जाणार्‍या प्रवाशाकडे विदेशी चलन सापडले.
कस्टम विभाग गोवाचे आयुक्त आर. मनोहर यांनी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उशिरा रात्री बंगळुरू – गोवा – दुबई मार्गे जाणार्‍या एअर इंडिया (क्र. एआय- ९९३) विमानामधून बंगळुरूहून दुबईला जाणार्‍या एका विदेशी नागरिकांची झडती घेतली असता त्याच्याकडे ७६,११५ विदेशी चलन जप्त करण्यात आले.

ज्याची किंमत भारतीय चलनात १४ लाख रुपये एवढी आहे. कस्टम विभागाने सदर विदेशी चलन हस्तगत करून त्या नागरिकाला ताब्यात घेतले. सदर कारवाई कस्टम आयुक्त गोवा विभागाचे आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
२०१८-१९ या वर्षात कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर आतापर्यंत ३.५ किलो सोने पकडले असून त्याची किंमत एक कोटी एवढी आहे. तसेच विदेशी चलन १४ लाख रुपये व इतर व्यावसायिक सामान मिळून ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे.