मडगाव पोलिसांनी काल पाजीफोंड येथील एका हॉटेलजवळ छापा टाकून पाच तरूणांना ताब्यांत घेऊन २ लाख रुपये किमतीचा ५४१ ग्रॅम गांजा हस्तगत केला.
याप्रकरणी पोलिसांनी हरिश मदार (२२) मालभाट, विशाल कनुजा (१९) जुना बाजार, गौतम पवार (२०) गांधी मार्केट. शुभम नाईक (२२) इराभाट दवर्ली, केतन नेडली (१८) सिने लता मागे, या पाच जणाना दोन दुचाकींसहीत ताब्यांत घेतले. ते मोठ्या प्रमाणात गांजाचा व्यवसाय करीत असल्याचे व तो सेवन करीत असल्याचे वृत्त मिळाले होते.
पोलिस निरिक्षक कपील नाईक यांना सुगावा लागल्याने सदर भागात पोलिस तैनात केले होते. सदर युवक एक रिक्षा व दोन दुचाक्या घेऊन आले. त्यांच्या खिशांत, डिकीत गांजाच्या पुड्या होत्या. गांधी मार्केट, पाजीफोंड येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा व्यवसाय चालतो. त्याशिवाय वाहनातून सर्वत्र पुरवठा करतात. त्यांत कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस उपअधिक्षक राजु राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरिक्षक कपील नायक तपास करीत आहेत.