आंतरराष्ट्रीय योगदिनी पिळगाव येथील आयडियल हायस्कूलच्या १०८ विद्यार्थ्यानी काल जागतिक विक्रम प्रस्थापित करतना सलग एक लाख दहा हजार सातशे तीन सूर्यनमस्कार घातले. योग शिक्षक संदेश बाराजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी पहाटे साडेपाच वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत हा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
यावेळी मोठ्या संख्येने पालक शिक्षक, नागरिक तसेच दिल्लीहून गोल्डन बुक ऑङ्ग वर्ल्ड रेकॉर्डस्चे गौरव मित्तल खास उपस्थित होते.
डिचोली लायन्स क्लब च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन झांटये जिमखाना सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमास आमदार राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झांटये, उद्योजक सुरेश झांटये, अध्यक्ष रोहित झांटये आदी उपस्थित होते.
आमदार प्रवीण झांटये यांनी मुलांचं अभिंनदन करताना जागतिक विक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. गोल्डन बुक ऑङ्ग वर्ल्ड रेकॉर्डस्चे गौरव मित्तल यांनी या जागतिक विक्रमाचे चित्रिकरण केले असून या विक्रमांबद्दल अभिंनदन केले. यावेळी सर्व मुलांचा गौरव करण्यात आला.