खाण प्रश्‍नावर मुख्यमंत्री मंगळवारपर्यंत बैठक घेणार

0
248

राज्यातील खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेणार आहेत, अशी माहिती काल खाणपट्ट्यातील एक आमदार दीपक पावस्कर यांनी दिली.

पावस्कर यांनी काल दुपारी ३.३० वा. पर्रीकर यांची भेट घेतली व राज्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने खाण अवलंबितांची स्थिती बिकट झालेली आहे. तसेच या लोकांनी पणजीत धरणे आंदोलनही सुरू केले असल्याची माहिती पर्रीकर यांना दिली.
खाण कंपन्यांनी खाण उद्योग बंद पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याचे सत्र अवलंबिले आहे. ही गोष्ट तसेच खाण उद्योग सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच खाण कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले जाणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच ट्रक मालकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी विनंतीही आपण मुख्यमंत्र्यांना केल्याचे पावस्कर म्हणाले.