मोपा विमानतळ परिसरातील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम

0
192

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नियोजित मोपा विमानतळ परिसरातील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली आहे.

गोवा सरकारने राष्ट्रीय हरीत लवादाकडे दाद मागावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. मोपा विमानतळ परिसरातील हजारो झाडे तोडण्याच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती दिली होती. खंडपीठात या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली.
सरकारने राष्ट्रीय हरीत लवादासमोर (एनजीटी) मोपा विमानतळ प्रकल्पाला झाडे संरक्षण कायदा लागू होतो, अशी भूमिका मांडली. तर राज्य सरकारने कालच्या सुनावणीच्या वेळी मोपा प्रकल्पाला झाडे संरक्षण कायदा लागू होत नाही, अशी भूमिका घेतली.